पाषाण :
साई चौक, सुस रोड, पाषाण येथे लॉन्ड्री दुकान व इडली व्यवसायिकाच्या दुकानात आग लागली होती. लॉन्ड्री दुकानाचे शटर बंद होते दोन्ही दुकानात मोठ्या प्रमाणात धूर झालेला होता. आगीचा लोट दुकानातून बाहेर पडत होता. ही आग गुरुवार दि. ३० एप्रिल रोजी रात्री ११:३० वा. आसपास लागली होती. सुदैवाने यामध्ये कोणाला काही इजा झाली नसून लॉन्ड्री व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले आहे.







अग्निशामक विभागाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तीन अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाले. त्यांनी लॉन्ड्री व्यवसायिकाचे शटर उचकटून अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. दुकाना बाहेर पडलेले आगे ची लोट पाहता स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. परंतु अग्निशामक दलाचे जवानांनी व स्थानिक नागरिकांनी वेळेची आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
अग्निशमन विभागाकडील पाषाण, बाणेर ,औंध अग्निशमन केंद्राच्या तीन अग्निशमन वाहनाच्या मदतीने ही आग विजवण्यात आली. आगीमध्ये लॉन्ड्री दुकानातील ग्राहकांची कपडे व इतर साहित्य जळाले तसेच इडली व्यवसायिकाचे साहित्य जळाले आहे. आगीचे अंदाजे कारण समजू शकले नसल्याची माहिती पाषाण केंद्राचे प्रमुख शिवाजी मेमाने यांनी दिली.
सदर आगीच्या वर्दीवर पाषाण अग्निशमन केंद्राचे केंद्र अधिकारी शिवाजी मेमाणे, बाणेर अग्निशमन केंद्राचे प्रभारी अधिकारी विष्णू राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन जवान रोहित पुष्पराज, आकाश किरवे, सिद्धार्थ जोगदंड, शत्रुघ्न वाजे, गणेश शिंदे, सुमित गाजरे इत्यादी आगीवर नियंत्रण मिळवून वीस मिनिटांमध्येआग पूर्णपणे विझवुन इतरत्र आग पसरू दिली नाही व आजूबाजूचा धोका दूर केला. आगीमध्ये जखमी अथवा कोणीही अडकले नाही.








