पुणे महापालिका आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे सोसायटी स्तरावर एसआयआर मॅपिंग सुविधा सुरू…

0
slider_4552

बालेवाडी :

पुणे महापालिका आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे विविध सोसायटीत एसआयआर मॅपिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे.

शनिवारी दुपारी बालेवाडी येथील ४३ प्रिवेट ड्राईव सोसायटीत पहिला कॅंप घेऊन शुभारंभ करण्यात आला. सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ४३ प्रिवेट ड्राईव सोसायटीचे चेअरमन आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे उपाध्यक्ष मोरेश्वर बालवडकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या कार्यक्रमाला निवडणूक अधिकारी मांजरे साहेब, पडाळे साहेब व बीएलओज यांनी नागरिकांना मॅपिंग साठी मदत केली. नंदन स्पेक्ट्रम, ब्लिस अव्हेन्यु, संस्कृती होम्स, साई सिलिकॉन मधील नागरिक मोठ्या प्रमाणावर हजर होते.

मोरेश्वर बालवडकर यांनी विशेष परिश्रम घेत कॅंप यशस्वी केला. आशिष कोटमकर, दफेदार सिंह व रमेश रोकडे फेडरेशन तर्फे उपस्थित होते. रविवार पासून विविध सोसायटीत कॅम्प घेतले जाणार आहेत. याचा फायदा नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पुणे महापालिका आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे करण्यात येत आहे.

See also  बालेवाडी येथील ॲड. पांडूरंग थोरवे यांची जेजुरी येथील मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तपदी नेमणूक..