बाणेर :
प्रभाग क्र. ९ मधील मुख्य रस्ते तसेच अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसंदर्भात भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडळाच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांची भेट घेण्यात आली.
बैठकीदरम्यान अतिवृष्टीमुळे खराब झालेले रस्ते, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, नागरिकांना होत असलेला मनस्ताप, वाहतुकीतील अडथळे तसेच अपघातांचा वाढता धोका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करणारे निवेदन आयुक्तांना सादर करण्यात आले.







याशिवाय, सुतारवाडी मुख्य रस्त्याच्या कामासाठी संबंधित खात्यामार्फत आवश्यक आर्थिक तरतूद करून हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी आयुक्तांना देण्यात आल्या.
निवेदनाची दखल घेत आयुक्तांनी संबंधित विभागाला तात्काळ आवश्यक त्या सूचना देण्यात येतील व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेतली जातील, तसेच सुतारवाडी मुख्य रस्त्याच्या कामाबाबतही आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी नगरसेविका रोहिणीताई सुधीर चिमटे, सचिन पाषाणकर (अध्यक्ष, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ), अनिकेत चांदेरे, प्रतीक साबळे उपस्थित होते.
प्रभागातील नागरिकांना सुरक्षित व खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत आणि प्रलंबित रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.








