पुणे :
महाराष्ट्राची समृद्ध लोकपरंपरा जपण्यासाठी आणि महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वामा वुमन्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मंगळागौर स्पर्धा २०२६’च्या तिसऱ्या पर्वाचा सोहळा बाणेर येथील माऊली गार्डन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. वामा वुमन्स क्लबच्या अध्यक्षा पूनम विशाल विधाते यांच्या पुढाकारातून या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.






श्रावण महिन्याचे औचित्य साधून आयोजित या स्पर्धेत पुणे शहर व परिसरातील अनेक महिला संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक मंगळागौर खेळ, फुगड्या, विविध नृत्ये आणि पारंपरिक वेशभूषेतील सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
या स्पर्धेत मातब्बर संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.
अंतिम निकाल खालीलप्रमाणे :
* प्रथम क्रमांक (🥇): सुवासिनी ग्रुप (बालेवाडी)
* द्वितीय क्रमांक (🥈): बेलियर क्वीन (महाळुंगे)
* तृतीय क्रमांक (🥉): नथीचा नखरा (जांभुळवाडी)
* चतुर्थ क्रमांक (🏅): आदिशक्ती मंगळागौर ग्रुप (लोहगाव)
* पांचवा क्रमांक (🏅): नक्षत्र ग्रुप (हडपसर)
“मंगळागौर हा केवळ खेळ किंवा नृत्याचा कार्यक्रम नसून आपल्या समृद्ध संस्कृतीशी आणि परंपरेशी जोडणारा सुंदर सेतू आहे. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आणि महिलांना एकत्र आणून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. भविष्यातही महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कलागुणांसाठी वामा वुमन्स क्लब विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम राबवेल.”
पूनम विशाल विधाते (अध्यक्षा, वामा वुमन्स क्लब)








