सुतारवाडी येथील सुर्वेज ढाब्यावर पोलिसांची कारवाई; अवैध मद्यसाठ्यासह मालक व मॅनेजरला अटक…

0
slider_4552

पुणे:

बाणेर पोलिसांनी पाषाण परिसरातील ‘सुर्वेज ढाब्यावर’ (Surve’s Pure Non-veg, सुतारवाडी) छापा टाकून बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवलेला मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६१,२२० रुपयांची दारू आणि बिअर हस्तगत केली असून, हॉटेल मालकासह मॅनेजरवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईचा तपशील:

* घटनास्थान: मुंबई-बेंगळुरू महामार्गाचा सर्व्हिस रोड, सुतारवाडी-पाषाण, पुणे.

* जप्त केलेला मुद्देमाल: ६१,२२० रुपये किमतीच्या बेकायदेशीर दारू आणि बिअरच्या बाटल्या.

* अटक करण्यात आलेले आरोपी:

* कुणाल सुधाकर गायकवाड (वय ३९, रा. पिंपळे गुरव – हॉटेल मालक)

* गोपाल श्रीकृष्ण निचळ (वय ४५, रा. भुगाव – हॉटेल मॅनेजर)

अशी झाली कारवाई:

१८ ऑगस्ट २०२६ रोजी बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त सुरू असताना सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप यांना गुप्त बातमीदाराकडून सुर्वेज ढाब्यावर विनापरवाना दारू विक्री सुरू असल्याची पक्की माहिती मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ सुतारवाडी येथील ढाब्यावर छापा टाकला. हॉटेलच्या आतील भागात तपासणी केली असता दारू व बिअरचा साठा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून मॅनेजर गोपाल निचळ याला ताब्यात घेतले आणि मुद्देमाल जप्त केला. यानंतर मालक कुणाल गायकवाड याच्यावरही गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.

ही धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त चुलूमुला रजनीकांत आणि सहायक पोलीस आयुक्त ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खिल्लारे, पीएसआय बालाजी सानप व अंमलदार सौरभ पाटील, गणेश मुंढे यांच्या पथकाने केली.

See also  पैशावर विश्वास नका ठेवू, विश्वासावर पैसा ठेवा हे सांगणारी योगीराज पतसंस्था : ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे