बावधन :
बावधन-कोथरूड परिसरातील अनेक सोसायटी सभासदांना MNGL च्या कनेक्शन अथवा सेवेबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या निदर्शनास आले. प्रभागातील सोसायटीमध्ये MNGL बाबत निर्माण होत असलेल्या समस्यांवर चर्चा करून कायमस्वरूपी मार्ग काढता यावा यासाठी MNGL च्या अधिकारी वर्गासोबत चर्चासत्र/मिटिंग आयोजित करण्यात आली.
यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या सोसायटीमध्ये उद्भवणार्या समस्या अधिकार्यांसमोर मांडल्या. कनेक्शन मिळण्यात विलंब, MNGL च्या बिलांबाबत तक्रारी अश्या काही मुख्य तक्रारी यावेळी नागरिकांनी यावेळी मांडल्या. प्रभागातील नागरिकांच्या तक्रारींवर लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात याबाबतचे निवेदन नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी MNGL चे मुख्य अभियंता राहुल धानोरकर यांना दिले.
या चर्चासत्रामध्ये प्रभाग क्र. १० मधील विविध सोसायटींचे सभासद/ पदाधिकारी व MNGL चे मुख्य अभियंता श्री. राहुल धानोरकर पुणे मनपा पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता संदेश शिर्के व इतर मान्यवर तसेच या चर्चासत्राचे आयोजक नगरसेवक दिलीप वेडेपाटील, सतीश शिंदे, अतुल पाटील, उदय दाणी, पराग सपकाळ, अमिता नीलाखे, सचिन पंडित, देवीदास भाग्यवंत, विशाल कानहेरकर, प्रा. भगवान पांडेकर, आदि मान्यवर उपस्थित होते.