बाणेर :
बाणेर नागरी सहकारी पतसंस्था बाणेर यांच्या वतीने शशिकांत दर्शने यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत मधून निवडून आलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य व मुळशी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल तसेच भैरवनाथ देवस्थान बाणेर च्या ट्रस्ट मधे निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ घेण्यात आला.




या प्रसंगी बोलताना बोलताना योगीराज पतसंस्था बाणेर संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, बाणेर नागरी पतसंस्थेचे सामाजिक क्षेत्रात चांगले योगदान आहे. डॉ. दिलिप मुरकुटे यांनी सहकाराचा गाडा मोजक्या आणि चांगल्या सहकार्याच्या साथीने यशस्वी पणे चालवलेला आहे. गावची एकात्मतेची भावना सरपंच आणि सदस्यांनी टिकून ठेवावी असे ही त्यांनी सरपंचांना मार्गदर्शन करताना सांगितले.
या वेळी बोलताना नगरसेविका ज्योती कळमकर यांनी सर्व सरपंच उपसरपंच सहित सर्वानवर जनतेची जबाबदारी आहे. ती आपण पार पाडली पाहिजे.
नगरसेविका सप्नाली सायकर यांनी सांगितले की, बाणेर नागरी पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी सन्मान केला जातो जेणेकरून प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाण असायला हवी. त्यामुळे जबाबदारीनं जनतेची सेवा करावी.
या वेळी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी बाणेर नागरी सामजिक सहकार क्षेत्रात चांगले काम केले आहे, तसेच आपण सर्वांनी बाणेर गावचा विकासाचा फॉरमॅट एकत्र राहून टिकवायचा आहे असे सांगीतले.
कारोना काळात देखील शाखेने चांगलें काम करून अ दर्जा मिळवला. संस्थेच्यावतीने सामाजिक सहकार क्रीडा क्षेत्रामध्ये चांगला काम करणाऱ्या १ सप्टेंबरला भैरवनाथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. संस्थेच्या वतीने गोरगरीबांना मदत केली जाते, ज्येष्ठ नागरीक पेन्शन दिली जाते. अनाथ महिलांना पेन्शन तसेच सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाला दरवर्षी दिवाळीला मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रतीचा फराळ दिला जातो, ची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे यांनी दिली.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, समाज भूषण शांताराम महाराज निम्हण, मृदंगमणी पांडुरंग दातार, डॉक्टर दिलीप मुरकुटे, शशिकांत दर्शने, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, मा. नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर , डॉ. सागर बालवडकर, विशाल विधाते, नितीन कळमकर, रामदास विधाते, विजय विधाते, अशोक मुरकुटे, ॲड. पांडुरंग थोरवे, ॲड. दिलीप शेलार, स्वाती ढमाले ,ॲड. सुदाम मुरकुटे, राजेंद्र धनकुडे, राम गायकवाड, राजेंद्र मुरकुटे, सरपंच गणेश जांभुळकर, बबनराव चाकणकर, गणेश कळमकर, अतुल अवचट, प्रल्हाद सायकर आदी उपस्थित होते.








