महिलांना सक्षम करण्यासाठी प्रभाग ९ मधे राष्ट्रवादी काँग्रेस चा पुढाकार : रुपाली चाकणकर

0
slider_4552

बाणेर :

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक ९ आयोजित हळदी-कुंकू समारंभ तिसरा व अंतीम टप्पा १४ तारखेला संपन्न झाला. याप्रसंगी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर, सरला चांदेरे, विमल बालवडकर, प्रा.रुपाली बालवडकर, शिल्पा कळमकर, पुनम विधाते, सुषमा ताम्हाणे, जान्हवी बालवडकर, प्राजक्ता ताम्हाणे, डॉ. सागर बालवडकर, समीर चांदेरे, मनोज बालवडकर, विशाल विधाते तसेच असंख्य महिला भगिनी या कार्यक्रमा प्रसंगी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

प्रास्ताविक मध्ये प्रा. रुपाली बालवडकर यांनी प्रास्ताविक मध्ये सांगीतले की, पवार साहेबांच्या विचार धारणे मुळे प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांसाठी व्यवस्था निर्माण झाले आहे. पवार साहेबां मुळेच महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले असे सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी महिलांनी सक्षम व्हायला हवे, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गरीब कष्टकरी महिलांना स्थान दिलेला दिले जात आहे. तसेच अतिशय नियोजन बद्ध कार्यक्रम घेतल्याचे सांगितले,

खासदार वंदना चव्हाण बोलताना म्हंटले की, बाणेर प्रभागात स्मार्ट स्मार्ट सिटी येण्याअगोदर बाबुराव चांदेरे यांनी अतिशय सुंदर बनविले होते. पण गेल्या पाच वर्षात विरोधी पक्षात असून देखील त्यांनी आपल्या कामाचा वेग कमी केला नाही. प्रभागात वेगवेगळे कार्यक्रम सतत राबविले जातात. महिलांनी घरा सोबत बाहेर समाजात देखील दिशा द्यायचे काम करावे असे देखिल त्यांनी म्हंटले.

या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेशअध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले की, महीला सक्षमीकरणाची गरज ओळखून बाबुराव चांदेरे नेहमीच महिलांसाठी विविध कार्यक्रम योजना राबवतात. महिलांनी स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे असेही त्या म्हणाल्या. महिलांना सक्षम करण्यासाठी प्रभाग क्रमांक ९ राष्ट्रवादी काँग्रेस कायम पुढाकर घेईल असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी केले होते. सूत्रसंचालन नितीन कळमकर यांनी केले तर आभार बाबुराव चांदेरे यांनी मानले.

See also  बालेवाडी फाट्यावरील सेक्स रॅकेटचा भांडाफोड चतुःशृंगी पोलिसांची कारवाई.