बाणेर :
दरवर्षी प्रमाणे साजरा होणारा बाणेर ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थान उत्सव कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्याची माहिती श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर व समस्त ग्रामस्थ बाणेर यांच्या वतीने देण्यात आली.
उत्सवा बाबत माहिती देताना श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, दरवर्षी बाणेर गावातील श्री भैरवनाथ उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. सर्व ग्रामस्थ देवाचा उत्सव साजरा करतात परंतू यावर्षी कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता केन्द्र सरकार व राज्यसरकार यांनी सर्व उत्सव यात्रा यांवर बंदी घातली आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता देवाचा उत्सव रद्द करणे सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. म्हणून भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट वतीने तसे जाहिर निवेदन करण्यात आले आहे.
ट्रस्ट चे सचिव डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, सर्व ग्रामस्थ उत्सवाची वाट पाहत असतात परंतू कोरोना मुळे सगळी कडे भयंकर परिस्तिथी आहे. त्यामुळे उत्सव रद्द करणे अनिवार्य आहे. म्हणून ट्रस्ट ने सर्वानुमते उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून स्वतः ची काळजी घ्यावी असे मुरकुटे यांनी आव्हान केले.
श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री. ज्ञानेश्वर तापकीर (उपाध्यक्ष), श्री. दिलीप मुरकुटे (सचिव) आणि श्री. लक्ष्मण सायकर (खजिनदार) यांच्यावतीने जाहीर निवेदन जारी करण्यात आले.
ट्रस्ट चे भाविकांसाठी निवेदन :
1. मंदिराच्या आवारात भाविकांनी गर्दी करू नये.
2. शासनाच्या आदेशानुसार मंदिर बंद असणार आहे.
3. उत्सव रद्द करण्यात आल्यामुळे त्रयस्थ व्यक्तींकडे देणगी जमा करु नये.
4.देणगी द्यावयाची असल्यास श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टशी किंवा विश्वस्तांशी संपर्क साधावा.
5.इतर माहिती अथवा शंका असल्यास ट्रस्ट अथवा विश्वस्तांशी संपर्क साधावा.