पाषाण सुतारवाडी येथे महानगरपालिकेच्या दूषित पाणी विरोधात शिवसेनेच्या वतीने पुणे महानगर पालिका आयुक्तांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन.

0
slider_4552

पुणे :

पाषाण सुतारवाडी येथे महानगरपालिकेच्या दूषित पाणी विरोधात शिवसेनेच्या वतीने पुणे महानगर पालिका आयुक्तांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करत निवेदन देण्यात आले.

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गटनेते पृथ्वीराज सुतार, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे, विधानसभा प्रमुख योगेश मोकाटे, विभाग संघटक संजय निम्हण, विभाग प्रमुख संतोष तोंडे, युवासेना पदाधिकारी अमित रणपिसे, राम थरकुडे, दिनेश नाथ, ऋषिकेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

गेले आठ महिने पाषाण सुतारवाडी परिसरामध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावेळी शहरप्रमुख संजय मोरे यांनी आक्रमक भूमिका घेत आयुक्तांच्या केबिनमध्ये खाली बसून आंदोलन केले व लेखी आश्वासन देण्याची मागणी केली.

शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, सुतारवाडी पाषाण परिसरामध्ये दूषित पाणीपुरवठा करून महानगरपालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. वारंवार तक्रार करून देखील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही ही बाब गंभीर आहे.

यावेळी आयुक्तांनी तीन अभियंत्यांची टीम तयार करून हा प्रश्न तातडीने सोडवण्याची येईल असे आश्वासन दिले आहे.

See also  मुलींसाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन : भाजपचे प्रकाश बालवडकर यांच्या वतीने.