मुलींसाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन : भाजपचे प्रकाश बालवडकर यांच्या वतीने.

0
slider_4552

बालेवाडी :

पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात नुकतीच एक भीषण घटना घडली. काही नराधमांनी एका निष्पाप अल्पवयीन मुलीचा निर्घृणपणे जीव घेतला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे महिला व मुलींमध्ये एक अनामिक दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीतून बाहेर पडून स्वतः च्या संरक्षणा साठी महिलेने सक्षम होयाला हवे.

महिलांनी सक्षम व्हावे आणि स्व रक्षणासाठी नेहमी सिद्ध राहावे म्हणून महिलांचा डळमळीत झालेला आत्मविश्वास पुन्हा मजबूत करण्यासाठी एक वेगळा उपक्रम भाजपा सहकार आघाडीचे प्रभारी प्रकाश बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला.

शौर्य मार्शल आर्ट्स, सेल्फ डिफेन्स यांच्या साहाय्याने महाळुंगे-बालेवाडी स्टेडियममध्ये राज्यस्तरीय ओपन किक बॉक्सिंग टुर्नामेंट व मुलींसाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉक्सिंगच्या स्पर्धेत राज्यभरातून मोठ्या संख्येने मुलामुलींनी सहभाग घेतला. तसेच अनेक मुलींनी स्वसंरक्षणाचे धडेही गिरवले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी यात सहभाग घेतला.

यावेळी बोलताना मयुरी प्रणव बालवडकर यांनी सांगितले की,”आज येथे सर्व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे गिरवताना आणि बॉक्सिंग करताना पाहून मला खूप अभिमान वाटतोय. यातून मुलींना आपल्या ताकदीची जाणीव होतेय. मुलींनी नेहमी असेच स्ट्राँग व सुरक्षित रहावे, अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे.”

या वेळी प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, महिलांसाठी नेहमी काहीतरी चांगले करण्याची धडपड मयुरी करते. मयुरीने तिच्या वागण्यातून व कामातून अल्पावधीतच आमच्या कुटुंबात सुनेपेक्षाही एक मुलगी म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. तिची सामजिक क्षेत्रात काम करण्याची आवड तिचे वेगळे स्थान निर्माण करत आहे.

यावेळी भाजपासहकार आघाडीचे प्रभारी प्रकाश बालवडकर, भाजपा सदस्या मयुरी प्रणव बालवडकर, उद्योजक संजय पाडाळे, काळूराम गायकवाड, भाजपा किसान विकास मोर्चा उपाध्याक्ष हनुमंत बालवडकर,
प्रकाश बालवडकर स्वाभिमानी शेतकरी संघटना बालाजी पाटील, आदी उपस्थित होते.

See also  बाणेर नागरी पतसंस्था चा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.