बाणेर :
श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल बाणेरने पालक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी शैक्षणिक वर्षाच्या फी मध्ये 30 टक्के कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर ती सध्या पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच अनेक पालकांच्या नोकऱ्या देखील गेले आहेत अशा पालकांच्या मुलांचे आर्थिक कारणामुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष शिवलाल धनकुडे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
बाणेर परिसरामध्ये सीबीएससी बोर्डाची सर्वात कमी फी घेणारी शाळा म्हणून आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल आहे. यातच स्थानिक पालकांचा विचार करून शाळेच्या फी मध्ये तीस टक्के कपात करण्याचा निर्णय हा स्वागतार्य असल्याचे यावेळी पालकांनी सांगितले.
शिवलाल धनकुडे म्हणाले, ऑनलाइन शाळेच्या संदर्भामध्ये पालकांच्या अनेक तक्रारी शाळेकडे येत होत्या या तक्रारींकडे व मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीकोनातून सहानुभूतीपूर्वक पाहण्याचा विचार संस्थेने केला. यासाठी पालकांची विशेष सभा घेऊन शिक्षकांचा व पालकांच्या समन्वयातून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कोरोना पार्श्वभूमीवरती फी कमी करणारी ही पहिलीच पुणे शहरातील शाळा ठरली आहे.
डॉक्टर विजय रायकर म्हणाले माझा मुलगा आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीला शिकतो शाळा मुलांचे शिक्षणासाठी परिश्रम घेत आहे. कोरोना मध्ये पालकांची परिस्थिती लक्षात घेऊन शाळेने फी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा महत्वपूर्ण व पालकांसाठी दिलासा देणारा आहे.
राजकुमार जैन म्हणाले, मी शिक्षक पालक समितीचा सदस्य आहे शाळेने मागील पाच वर्षापासून ही वाढ तर केलीच नाही तसेच पालकांच्या समस्यांचा विचार करून या वर्षी फी मध्ये देखील सवलत दिली आहे. पालकांना मोठा दिलासा देण्याचे काम या संकट कालावधीत शाळेने केले आहे.
सुहास पाषाणकर म्हणाले, माझे घड्याळाचे दुकान आहे. कोरोना कालावधीमध्ये हे दुकान पूर्णपणे बंद होते .शाळेमध्ये माझ्या कुटुंबातील चार विद्यार्थी शिकतात. शाळेने फी कमी केल्याने आमच्या कुटुंबाला आधार मिळाला आहे.
भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बाणेर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे चांगले शिक्षण घेता यावे या उद्देशाने शिक्षण संस्थेमध्ये काम केले जात असल्याने बहुतांश मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतात. याचा विचार करून शाळेने शैक्षणिक वर्ष 2021 22 करिता ही सवलत जाहीर केली आहे तसेच कोरोना मध्ये आई वडील दोघेही गमावले गेल्यानंतर विद्यार्थ्याची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय देखील शाळेने घेतला आहे.