बाणेर :
बाणेर येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दरवर्षीप्रमाणे शालेय निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी बाणेर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांनी पाहुण्यांसमोर परेड सादर केली, यामध्ये शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे अनुशासन बघायला मिळाले हेड बॉय, हेड गर्ल, सांस्कृतिक मंत्री, क्रीडामंत्री, तसेच शालेय अनुशासन मंत्री यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर शिवनेरी हाऊस, प्रतापगड हाऊस, रायगड हाऊस, तोरणा हाऊस या चारही हाऊसचे प्रमुख प्रतिनिधी तसेच उपप्रमुख प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना कडून प्रतिज्ञा घेतली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलाल धनकुडे, अध्यक्षा सुरेखा धनकुडे, सेक्रेटरी विराज धनकुडे, सीईओ सुषमा भोसले, उपप्राचार्य राधिका बंसल यांनी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना बॅचेस प्रदान केले. यावेळी प्रमुख पाहुणे लाभलेल्या पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शालेय अनुशासन कसे असावे तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे किती गरजेचे आहे, आणि त्याकरिता सतत प्रयत्न करणे याबद्दल मार्गदर्शन केले.