सुस/ म्हाळुंगे :
पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सुस आणि म्हाळुंगे गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी. त्यांचे निराकरण कसे करता येईल, तसेच भविष्यात गावातील विविध विकास कामे मार्गी लावण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर यांच्या वतीने पुणे महानगर पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गाव भेट दौरा आयोजित केला होता.
यावेळी सुस आणि म्हाळुंगे ग्रामस्थांच्यावतीने विविध प्रश्न मांडण्यात आले. दोन्ही गावांचा जिव्हाळ्याचा असणारा पाणी प्रश्न, तसेच म्हाळुंगे गावातील टीपी प्लॅन नव्याने बांधण्यात आलेली बांधकामे नियमित करणे, रस्ते आणि सांडपाणी व्यवस्था, कचरा समस्या असे अनेक प्रश्न ग्रामस्थांच्या वतीने मांडण्यात आले. हे अनेक प्रश्न मांडतानाच ग्रामस्थांनी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्याकडून बाणेर बालेवाडी प्रमाणे सुस – म्हाळुंगे चा देखिल विकास होईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी सांगितले की, ग्रामस्थांचे प्रश्न निश्चितपणे मार्गी लावले जातील. गावचा विकास करताना शेतकऱ्यांचे हित कसे जोपासले जाईल याकडे आवर्जून लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावचा विकास करताना कोणतेही राजकारण न करता येणाऱ्या प्रत्येकाच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. दोन्ही गावांमधील नव्याने उभी राहिलेली बांधकामे नियमित केली जाईल, असा विश्वास यावेळी त्यांनी ग्रामस्थांना दिला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा पाणी प्रश्न मार्गी लावला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नेमण्यात आलेल्या समन्वयकांच्या माध्यमातून सर्व समस्यांचं निराकरण केलं केलं जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. सुसगाव मध्ये मंजूर असलेले हक्काचे पाणी मिळवून देणार असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले. तसेच महाळुंगे गावामध्ये असणाऱ्या टीपी प्लॅन ठेवायचा की डीपी प्लॅन करायचा हे ग्रामस्थांनी मिळून ठरवावे ग्रामस्थांना हवे असेल तेच मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.
यावेळी नगरसेवक दीपक मानकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, महानगरपालिका विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, नगरसेवक दत्ता सागरे, कोथरूड विधानसभा महिला अध्यक्ष ज्योती सूर्यवंशी, सुनील चांदेरे, डॉ. सागर बालवडकर, स्वप्निल दुधाने, जि. प. सदस्य शंकर मांडेकर, विशाल विधाते, नितीन कळमकर, समीर चांदेरे, मनोज बालवडकर, निलेश पाडाळे, रूपाली बालवडकर, पुनम विधाते तसेच सुस म्हाळुंगे गावातील ग्रामस्थ नेते सामजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.