महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील पहिल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा

0
slider_4552

पुणे :

पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील पहिल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात असं पथक स्थापन करणारा मनसे हा पहिला राजकीय पक्ष ठरला आहे. पूर, इमारत दुर्घटना यासारख्या संकटकाळात हे आपत्ती व्यवस्थापन पथक सामान्य लोकांच्या प्रशासनाच्या मदतीला येईल. यामध्ये प्रशिक्षित पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांचा पथकात समावेश असेल.

कसे असेल मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक?
* मनसेने पुण्यात राज्यातील पहिले आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन केले
* * आपत्ती व्यवस्थापन पथकात 50 मुला-मुलींचा समावेश असेल
* शहरातील पूरस्थिती, इमारत दुर्घटना यासारख्या संकटांच्या वेळी मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाची मदत करणार
* * आपत्ती व्यवस्थापन पथकातील मुला-मुलींना मनसे प्रशिक्षण देणार

पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपैकी प्रशिक्षित पुरुष आणि महिला यांचा पथकात समावेश असेल.

पुणे शहरात सतत नैसर्गिक आपत्ती कोसळत असते. त्यासाठी 50 जणांचे प्रशिक्षित मनसे रेस्क्यू पथक कार्यरत असेल. पुणे शहरात वारंवार आपत्ती ओढवत असते. त्या पार्श्वभूमीवर विशेष आपत्ती पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

See also  महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार : रमेश बागवे