भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या घोषणा.

0
slider_4552

नवी दिल्ली :

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधताना शेतकरी, मुली आणि तरुणांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. काय म्हणाले पंतप्रधान बघूया.

1) सैनिकी शाळेत आता मुलींनाही प्रवेश

पंतप्रधानांनी केलेल्या घोषणांपैकी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे देशभरातील मिलिट्री स्कूल म्हणजेच सैनिकी शाळांमध्ये यापुढे मुलींनाही प्रवेश मिळेल.

2) मातृभाषेला प्राधान्य देण्यावर भर

भाषा विकासाच्या मार्गातील अडथळा ठरता कामा नये, असं म्हणत पंतप्रधानांनी मातृभाषेला प्राधान्य देणार

3) चीन आणि पाकिस्तानवर नाव न घेता निशाणा

भारत मोठ्या धाडसाने दहशतवाद आणि विस्तारवादाच्या आव्हानाचा सामना करत असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

4) नवीन शैक्षणिक धोरण

भारताचं नवं शिक्षण धोरण दारिद्र्याशी मुकाबला करणं आणि 21 व्या शतकाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून आखण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. शिवाय, नवीन शैक्षणिक धोरणात प्रादेशिक भाषांनाही महत्त्व देण्यात येणार आहे.

5) ध्येयपूर्ती असेल लक्ष्य

आजवर देशाच्या कानाकोपऱ्यात सोयी-सुविधा पुरवणं, हे आतापर्यंतच्या सरकारांचं लक्ष्य होतं, मात्र, यापुढे सर्व सोयी-सुविधा 100% गरजूंपर्यंत पोहोचणं, हे लक्ष्य असायला हवं, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

6) शहर आणि खेड्यातली दरी दूर करण्याची वेळ

शहर आणि खेड्यातली दरी दूर करण्यासाठी आता गावागावांपर्यंत ऑप्टिकल केबलचं जाळं पोहोचत असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.

7) अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य

शहरांप्रमाणेच खेड्याच्या विकासाकडेही लक्ष देणं गरजेचं असल्यचं पंतप्रधान म्हणाले.

8) कृषी क्षेत्रात वैज्ञानिकांचा सल्ला

संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत असताना भारताने कोरोना लस विकसित केली आणि लोकांना देण्याचं काम केल्याचं पंतप्रधान म्हणाले. असं झालं नसतं तर भारतात किती भयंकर परिस्थिती उद्भवली असती, याची कल्पनाच केलेली बरी, असंही ते म्हणाले.

9) नागरिकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप कमी होणार

देशाच्या शेवटच्या नागरिकापर्यंत सरकारी सोयी-सुविधा सुलभपणे पोहोचवण्यासाठी नेक्स्ट जनरेशन सुधारणा लागू केल्या जातील, असंही मोदी म्हणाले.

See also  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-व्हाउचर-आधारित डिजिटल पेमेंट सोल्यूशन ई-रूपी केले लाँच

10) ईशान्य भारताला संपूर्ण भारताशी जोडणार

आपल्या संभाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, “उत्तर भारतात सरकार कनेक्टिव्हिटीचा इतिहास रचत आहे आणि ही कनेक्टिव्हिटी केवळ पायाभूत सुविधांची नाही तर मनं जोडणारी आहे. लवकरच उत्तर भारत संपूर्ण देशाशी रेल्वे जाळ्याच्या माध्यमातून जोडला जाईल.”

11) जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेणार

जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघ पुनर्रचनेसाठा समिती स्थापन करण्याचं काम पूर्ण झालंय आणि तिथे विधानसभा निवडणूक घेण्यासाठी तयारी सुरू असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.

12) नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा

पंतप्रधान मोदी यांनी नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा करताना ऊर्जा क्षेत्रात भारताने आत्मनिर्भर व्हावं आणि हळू-हळू अक्षय्य ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करण्याचा संदेश दिला.

2030 पर्यंत 450 गिगाव्हॅट अक्षय्य ऊर्जा निर्मितीचं आपलं लक्ष्य आहे आणि मुदतीआधीच हे लक्ष्य आपण पूर्ण करू, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

13) 14 ऑगस्ट रोजी ‘फाळणी भयस्मृती दिन’

यापुढे 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी भयस्मृती दिन’ म्हणून पाळण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली.

15) 75 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्या सुरू करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पुरेशा पायाभूत सुविधा नसतील तर देशाच्या विकासावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे नवीन जलमार्ग किंवा नवी ठिकाणं सी-प्लेनने जोडण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. भारतीय रेल्वेही वेगाने आधुनिक रंगात रंगताना दिसत आहे.”

16) नागरिकांनी कॅशलेस आणि स्वच्छतेचा अंगिकार करावा

देश डिजीटल होत असल्याने आपण कॅश ट्रॅन्झॅक्शन कमीत कमी करायला हवं, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

त्यांनी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर रोखण्याचं आवाहनही केलं. तसंच नदी प्रदूषित करू नये आणि समुद्र किनारेही स्वच्छ ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.