राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लवकरच राज्याच्या दौऱ्यावर निघणार : सुप्रिया सुळे

0
slider_4552

नागपूर:

खासदार सुप्रिया सुळे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघणार असल्याची माहिती दिली.

साहेब घरात कमी आणि दौऱ्यावर जास्त असतात, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. राज्यात कोरोनामुळे 450 पेक्षा जास्त मुलं अनाथ झाली आहेत. अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणासाठी राष्ट्रवादी जीवलग काम करणार आहेत. अनाथ झालेल्या अल्पवयीन मुलींच्या लग्नाचा घाट घातला जातोय, हे थांबायला हवं यासाठी देखील ‘राष्ट्रवादी जीवलग’ काम करणार आहे, असंही त्यांनीस सांगितलं आहे. अर्बन प्लानिॅगमध्ये आपण फेल ठरलो, त्यामुळे यात आता लक्ष देणं गरजेचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मनपा निवडणुकीचा निर्णय मविआचे नेते घेणार

मनपात एकत्र निवडणूकीबाबत महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. प्रभाग पद्धत बाद झाल्याने फायदा तोट्याचा प्रश्न नाही. निवडणूकीत पक्षातील सर्वांना एकत्र घेऊन चालणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल विचारलं असता सुप्रिया सुळे यांनी ते ज्येष्ठ नेते, ते काय बोलले हे मी ऐकले नाही. त्यामुळे बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

पुण्याच्या गॅंगरेपमधील सर्व आरोपींना अटक झालेय. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून पिडीतेला न्याय मिळवून देणार आहे. छेडछाडमुक्त महाराष्ट्र यासाठी आजंही पुढाकार, कॉलेजमध्ये याबाबत जनजागृती कार्यक्रम सुरु व्हावेत, असही त्या म्हणाल्या.

ओबीसी बैठकीनंतर कालच्या बैछकीत सर्वांचं एकमत होतं. काल देवेंद्र फडणवीस बोलले आज बावनकुळे वेगळं बोललं असेल, तर त्यांच्या पक्षात मतभेद आहे असं दिसतंय, असाही टोला सुळे यांनी लगावला.

शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज बिलाबाबत धोरणात्मक निर्णय घेतलाय. पाऊस कमी पडलेल्या 13 जिल्ह्या बाबत वेगळा निर्णय होणार आहे. महाराष्ट्राची जी परिस्थिती भाजप सरकारने करुन ठेवली होती, ती सुधारण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर आली आहे. केंद्रात खासदारांना विकास निधी मिळत नाही, पण महाराष्ट्रात आमदाराच्या निधीला कट लावला जात नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

See also  ब्रह्मगिरी वाचविण्यासाठी सहा राज्यांच्या वतीने एकत्रित पद्धतीने लढा देण्याचा निर्णय : राष्ट्रीय जलतज्ञ राजेंद्र सिंह

माणुसकीच्या नात्यानं मदत करा

केंद्र सरकारने माणुसकीच्या नात्याने आज महाराष्ट्राला मदत करावी. रोजगार, कोविड, महिलांचे प्रश्न येवढे मोठे प्रश्न राज्यात असल्याने मला नारायण राणे यांच्या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. केंद्र सरकार ईडीचा दुरुपयोग करतो? हा काही प्रश्न आहे का? माझ्या आयुष्यात सत्तेचा दुरुपयोग मी पहिल्यांदा बघीतला, विरोधात बोललं की पाठव ईडीची नोटीस. लढ लेंगे इससे भी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.