सेलिब्रिटींनी आपल्या आजू बाजूला तयार झालेल्या वलयाचा उपयोग समाजसेवेसाठी करावा : खासदार शबाना आझमी

0
slider_4552

पुणे :

सेलिब्रिटींनी आपल्या आजू बाजूला जे वलय तयार होते त्याचा उपयोग समाजसेवेसाठी करावा. कोणतेही कार्य करतांना लोकांच्या टिप्पणीकडे लक्ष न देता आपल्या कार्याला वाहून घ्यावे.

कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्य केल्यास यश निश्चितच मिळते.’ असे मत प्रसिद्ध फिल्म अभिनेत्री व खासदार पद्मभूषण शबाना आजमी यांनी मांडले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन ११ व्या भारतीय छात्र संसदेेच्या चौथ्या सत्रात ‘ सेलिब्रिटी आणि स्टारडमः चांगले, वाईट आणि रागीट’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे होते.

यावेळी आमदार श्रेयशी सिंग, अभिनेत्री व दिग्दर्शिका नंदीता दास आणि शास्त्रीय नृत्यांगणा खासदार पद्मविभूषण डॉ. सोनल मानसिंग हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.

भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होत आहे.

शबाना आजमी म्हणाल्या,’ मला जेव्हा यश मिळाले तेव्हा १९८६ मध्ये मुंबईतील ‘निवारा हक’ या स्वयंसेवी संस्थेशी जुळली. त्यामाध्यमातून ५० हजार गरीब कुटुंबांसाठी घर बांधून दिले. पुढे जाऊन खासदार झाली तेव्हा समाजसेवेचे अनेक दरवाजे उघडले गेले. असे समाजवेचे कार्य करतांना टीका टिपप्णीकडे लक्ष देऊ नये. जीजस आणि महात्मा गांधी यांच्यावरही टिप्पणी केली तेव्हा आपण तर यातील एक छोटे व्यक्ती आहोत. अपेक्षा न ठेवता कार्य करत राहा असा सल्ला ही त्यांनी दिला.’

श्रेयशी सिंग म्हणाल्या,’ विद्यार्थ्यांनी जीवनात कोणतेही कार्य करताना समर्पित भावनेने व कठोर परिश्रम करावे. त्याबरोबर येणारे यश आणि अपयश दोन्ही पचविण्याची तयार ठेवावी. सेलिब्रिटी झाल्यावर आपल्यावर मीडिया दोन्ही बाजूने पक्ष ठेवतील. शुटिंग खेळामध्ये जेव्हा मला यश मिळाले तेव्हा मिडियाने चांगली आणि वाईट दोन्ही बाजू मांडल्या. पण २०१४मध्ये याच खेळामध्ये सिल्व्हर पदक मिळाले तेव्हा मी सेलिब्रिटी झाली. आमदार झाल्यानंतर समाजसेवेसाठी याचा उपयोग करीत आहे.’
नंदिता दास म्हणाल्या,’ सोशल मिडियाने समाजात बरेच बदल आणले आहे. स्टार कोण आहे हे कसे ठरविणार आहे. सध्याच्या काळात स्टारडमचे स्तर वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळी आहेत. वर्तमान काळात प्रत्येक क्षेत्रात सेलिब्रिटी आहेत. खरे तर शिक्षक हे सर्वात मोठे सेलिब्रिटी आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक सुधारणेवर अधिक भर देण्याची गरज आहे. देशात खरे सेलिब्रिटी खूप मोठे आहेत त्यांना शोधून त्यांचा उपयोग समाजसेवेसाठी करावा.’

See also  केंद्र सरकारला ट्विटरवर कारवाई करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य : दिल्ली उच्च न्यायालय

डॉ. सोनल मानसिंग म्हणाल्या,’ तपस्या, साधना, श्रध्दा, ज्ञान योग आणि भक्ति योग यांना योग बनविल्यास जीवनात यश मिळते. त्यानंतर आपण स्वतः सेलिब्रिटी बनता. जीवनात कठीण परिश्रम, शिस्त, लक्ष्य आणि सर्वांचा आदर केल्यास व्यक्ती मोठा बनतो. समर्पण भावनेने आणि मन मोकळे करून जीवन जगा. कोणतीही कला ही जीवनाचे संतुलन सांभाळून ठेवते. त्यामुळे आपल्या कलेला जीवन समर्पित करा. यश आपोआपच तुमच्या मागे येते. जीवनात जे मिळाले ते समाजाला १० पटीने दान करा हीच सर्वात मोठी समाजसेवा आहे.’