बाणेर :
दिव्या सुनिल जाधव या मुलीला मेंदूच्या शस्त्रक्रिये साठी 25 हजार रुपयांची आर्थिक मदतीचा धनादेश योगीराज पतसंस्थेच्या वतीने दिव्याची आई संगीता जाधव यांच्याकडे संस्थेच्या ठेव संकलन आढावा बैठकीच्या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर व संचालकांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. याप्रसंगी काही सभासदांना 50 लाख रुपयांचे कर्ज वितरणही करण्यात आले.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, संस्था करोडो रुपयांचा नफा मिळवत असते परंतू नफ्या मधून सभासदांना 12% लाभांश वाटप करुन राहिलेल्या रक्क्मेचा वापर वैद्यकीय मदत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गरीब मुलींच्या लग्नात भांड्यांचा संसार अशा वेगवेगळ्या रुपात मदतीसाठी वापर करण्यात येतो. दिव्याच्या आईने शस्त्रक्रियेचा 25 लाख हा न झेपणारा खर्च ऐकून संस्थेने हा मदतीचा निर्णय घेतला. तसेच संस्थेने नुतन वर्षानिमित्त आकर्षक मुदत ठेव योजना 91 दिवसा साठी 7% ऐवजी 9% व्याजदराने 16 जानेवारी पासून चालू केली आहे. सभासदांचा या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असून 5 दिवसात संस्थेकडे 5 कोटी रुपयांची ठेव जमा झालेली आहे, हा सभासदांनी संस्थेवर ठेवलेल्या विश्वासाची पावती म्हणावी लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे शाखाध्यक्ष शंकरराव सायकर, शाखा उपाध्यक्षा अलका सिरसगे, सदस्य अनिल खैरे, दत्तात्रय भापकर, प्रदीप नेवाळे, पांडूरंग सुतार, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका भाग्यशाली पठारे, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.