पुणे :
मागच्या आठवड्यात पुणे महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाली. आघाडी, युती होणार की नाही ह्याचा निर्णय अजून झाला नाही. प्रत्येक पक्षाने आम्ही स्वबळावर लढलो तरी एवढ्या जागा जिंकून येतील असा दावा केला आहे.
त्यावर आघाडी करायची की नाही याचा निर्णय आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील. युती झाली नाही तरी आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती माजी मंत्री शिवसेनेचे पुणे शहर संपर्क प्रमुख सचिन आहिर यांनी पुण्यात दिली.
महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाली कोण कुठे उमेदवार कुठल्या प्रभागात निवडायचा याची सगळ्या पक्षांकडून तयारी सुरू आहे. त्यावर सचिन आहीर म्हणाले, आम्ही कुठला उमेदवार कुठे लढवायचा यांची चाचपणी सुरू केली आहे.