कर्नाटक विधान परिषद उपसभापती धर्मगौडा यांची आत्महत्या?

0
slider_4552

बंगळरु :

कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती आणि जेडीएस नेते एसएल धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रेल्वे रुळावर धर्मगौडा यांचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एच डी देवेगौडा यांनी देखील या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एसएल धर्मगौडा यांची आत्महत्या ही अत्यंत धक्कादायक घटना असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक विधान परिषदेत काँग्रेस नेत्यांनी धर्मेगौडा यांच्यासोबत धक्काबुक्की केली होती. इतकंच नाही तर त्यांना खुर्चीतून खालीही खेचलं होतं. त्यामुळे ते चर्चेत आले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली आहे.

See also  राहूल गांधी यांचे शेतकऱ्यांना पत्र केले अभिनंदन