पुणे :
करोनाच्या संकटातून बाहेर पडत महाराष्ट्राने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा एल्गार केला, खरा ती झालीच नाही. संघटक महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यात असमर्थ ठरले. अर्थात, या दरम्यानच्या काळात सर्व जिल्हा संघटना आपले संघ जाहिर करून बसले होते. ते कागदावरच राहिले.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या विरोधी गटातील संदीप भोंडवे यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर भ्रष्टाचाराचे आरोप करून वेगळाच एल्गार करत आमरण उपोषणाला सुरवात केली. आता महाराष्ट्राची कुस्ती आरोपांच्या आखाड्यात येऊन थांबली आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या सगळ्यातून पडद्यामागची वाट धरताना पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा केली. अर्थात, ही घोषणा अजून अधिकृत झालेली नाही. स्पर्धा होणार अशी कुठलीही माहिती जिल्हा संघटनांना कळविण्यात आलेली नाही. तेव्हा जोपर्यंत ही माहिती जिल्हा संघटनांना होत नाही तोवर स्पर्धा अधिकृत कशी असा आणखी एक आरोप संदीप भोंडवे यांनी पत्रकार परिषदेत केला.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने यापूर्वीच सिटी कॉर्पोरेशनबरोबर झालेला करार परिषदेसमोर आणलेला नाही. त्यासाठी संमंती घेतलेली नाही आणि तोंडी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जाहिर केलेली पारितोषिकेही अजून दिलेली नाही. त्यामुळे या करारपत्राची प्रत आम्हाला मिळत नाही, तोवर मी उपोषण सुरू ठेवणार असल्याचे भोंडवे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार देखील उपस्थित होते. त्यांनी देखील राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. सिटी कॉर्पोरेशनबरोबर झालेल्या कथित करारानुसार मल्लांना पारितोषिके मिळालेली नाही. राज्य कुस्तीगीर परिषदेने त्यांच्या अखेरच्या निवडणुकीनंतर अजून एकही बैठक घेतलेली नाही. मल्लांची दखल घ्यायलाही त्यांना वेळ नाही. आज उपोषणाचा तिसरा दिवस असूनही कुस्तीगीर परिषदेकडून अजून असे का, अशी साधी विचारणाही करण्यात आलेली नाही. आमचा कुस्तीला विरोध नाही. आम्ही केसरी स्पर्धेत खेळणार. पण, आम्हाला त्या कराराची प्रत मिळायलाच हवी.
पत्रकार परिषदेत कोण काय म्हणाले –
संदीप भोंडवे –
सिटी कार्पोरेशनबरोबरच्या करारा संदर्भात परिषदेच्या सदस्यांना अंधारात ठेवले
केसरी स्पर्धेला विरोध नाही. ती व्हावी. पण, सातारा संघटनेच्या माध्यमातून
करार करुनही महाराष्ट्र शासनाकडून ४२ लाख १८ हजार रुपये लाटले
योगेश दोडके –
कुस्तीगीर परिषदेचा कार्यभार ललित लांडगे कसा बघतात
परिषदेच्या परवानगीशिवाय त्यांचा शासनाशी स्पर्धा झाल्यावर पत्रव्यवहार
बाळासाहेब लांडगे आणि ललित लांडगे यांना दूर करावे