बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऐतिहासिक विजय नोंदवत मारली ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक

0
slider_4552

इंग्लंड :

भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऐतिहासिक विजय नोंदवत ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 20 वर्षीय युवा भारतीय शटलरने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या मलेशियाच्या ली जी जियाचा 21-13, 12-21, 21-19 असा तीन गेमच्या लढतीत पराभव करून प्रथमच अंतिम फेरी गाठली.

2001 मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या दिग्गज पुलेला गोपीचंद यांच्यानंतर या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय पुरुष शटलर आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो केवळ चौथा भारतीय पुरुष आणि एकूण पाचवा भारतीय खेळाडू आहे.

https://twitter.com/YonexAllEngland/status/1505203594240434187?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1505203594240434187%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  महिलांचे आयपीएल लवकरच सुरू होणार !