टोल नाक्याजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरुन सतत प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना देणार पास : नितिन गडकरी

0
slider_4552

नवी दिल्लीः

भारतात भविष्यात महामार्गावरुन जर तुम्ही लांबचा प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले की, महामार्गावरुन प्रवास करत असताना सरकारकडून एका ठराविक मर्यादेपर्यंतच टोल वसूल करणार आहे.

तसेच टोल नाक्याजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरुन सतत प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना पास देण्याची योजना आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महामार्गावरुन प्रवास करत असताना वसूल करण्यात येत असलेल्या टोल आणि रस्तेविषयक लोकसभेत माहिती देताना हा टोलविषयीचा निर्णय त्यांनी सांगितला. यावेळी त्यांनी सांगितले की, महामार्गावर टोलनाक्यांची संख्या मर्यादित असणार आहे म्हणजेच 60 किलोमीटरच्या आत दुसरा टोल नाका नसावा असा नियम करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महामार्गाजवळ राहणाऱ्या स्थानिकांनाही दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांना पास देण्यात येणार असून या पासमुळे त्यांच्याकडून टोल वसूल केला जाणार नाही. केंद्र सरकारची ही योजना तीन महिन्यात लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टोल नाके आता बंद ?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय सांगितला. महत्वाच्या मार्गावर 60 कि. मिटरच्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. साठ किलो मिटरच्या अंतरावर आता एक टोल नाका असणार असून, महामार्गाजवळ राहणाऱ्या वाहनधारकांना पास देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांना सांगितलेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.

टोल नाक्यांची संख्या कमी

नितीन गडकरी यांनी टोल नाक्याविषयी बोलताना सांगितले की, येत्या तीन महिन्यात देशातील टोल नाक्यांची संख्या कमी करणार असून महामार्गावर 60 किलोमीटरपर्यंत एकच टोल असणार आहे. त्यापेक्षा जादा टोल नाके एवढ्या अंतरावर असतील तर ते बंद करण्यात येणार आहेत.

वाहनधारकांना मोठा दिलासा

महामार्गाजवळ राहणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारच्या या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. महामार्गाजवळ म्हणजेच टोल नाक्याजवळ राहणाऱ्या व सतत टोल नाक्यावरुन ये जा करणाऱ्या वाहनधारकांकडून टोल घेतला जाणार नाही. त्यामुळे वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.

See also  ट्विटर कडून फ्लिट फीचरची सुविधा बंद करण्याची घोषणा

https://twitter.com/OfficeOfNG/status/1506228938833825795?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1506228938833825795%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F