केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात विविध कामगार संघटनांनी पुकारलला आज आणि उद्या देश व्यापी संप.

0
slider_4552

नवी दिल्ली :

आज आणि उद्या भारत बंद (Bharat Bandh) असणार आहे. 28 आणि 29 मार्च रोजी विविध कामगार संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली असल्यानं भारत बंद असणार आहे. या भारत बंदला रेल्वे, रस्ते, वाहतूक आणि विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात हा भारत बंद असून त्याचा वाईट परिणाम कर्मचारी, शेतकरी आणि सर्वसामान्यांवर होत आहे. कामगार संघटनांनी कोळसा, पोलाद, तेल, दूरसंचार, टपाल, आयकर, कॉपर, बँक आणि विमा क्षेत्रांना संपाबाबत सूचना देणार्‍या नोटिसा पाठवल्या आहेत. बँकिंग क्षेत्रही या संपात सहभागी होणार असल्याचं ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने म्हटलं आहे.

See also  सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा थांबविलेला महागाई भत्ता आणि महागाई सवलत या तीन हप्त्यांत देण्याचा निर्णय