मनिला (फिलिपाईन्स) :
भारताच्या पी व्ही.सिंधूला आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत अखेर ब्रॉंझपदकावरच समाधान मानावे लागले. स्पर्धेत शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत तिला जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला.




सिंधूने पराभवापूर्वी संपूर्ण लढतीत यामागुचीला चांगलीच झुंज दिली. तीन गेम आणि १ तास ६ मिनिटे रंगलेल्या लढतीनंतर सिंधूला २१-१३, १९-२१, १६-२१ अशी हार पत्करावी लागले.
आशियाई स्पर्धेतील सिंधूचे हे दुसरे ब्रॉंझपदक ठरले. यापूर्वी २०१४ मध्येही तिला ब्रॉंझपदकावरच समाधान मानावे लागले होते.
सिंधूने पहिला गेम अगदी सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये दोन गुणांच्या मध्ये वेळ घालवत असल्यामुळे सिंधूला पंचानी ताकिद दिली. तेव्हा तीने पंचांशी वादही घातला. त्यामुळे तिला एक गुण गमवावा लागला. याचा परिणाम सिंधूच्या खेळावर झाला आणि यामागुचीने याचाच फायदा उठवून दुसरी गेम जिंकत बरोबरी साधली.
तिसऱ्या निर्णायक गेमध्ये सिंधू सुरवातीपासूनच मागे पडली होती. यात यामागुचीने पाच मॅच पॉइंट मिळविले. सिंधूने यातील काही मॅच पॉइंट वाचवले, पण ती पराभव वाचवू शकली नाही.








