सुसगाव :
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सुस येथे विविध विकास कामाच्या पाहणी दौरा केला. त्या वेळी ते म्हणाले की, नव्याने महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सुरवातीला पाणी, ड्रेनेज, कचरा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था अशा अनेक समस्या होत्या परंतु ही गावे पुणे महानगरपालिकामध्ये समाविष्ट झाल्यामुळे या गावांमधील मूलभूत सोयी – सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. महापालिकेच्या बजेटमध्ये पाण्याला जास्त महत्व दिले असून नवीन समाविष्ट २३ गावांसाठी २०० कोटी रुपयांचे बजेट ची तरतूद केली आहे. समस्त गावांमध्ये प्रामुख्याने जाणवत असलेल्या गरजा लक्षात घेता नविन समाविष्ट गावांकरिता भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.
यावेळी आयुक्त बोलताना पुढे म्हणाले की, पावसाळ्या पूर्वी येथील नाल्याचे काम व इतर महत्त्वाची कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, सुस व म्हाळुंगे गावासाठी पाण्याच्या टाक्या व सोसायट्यांना स्वतंत्र पिण्याच्या पाण्याच्या लाईन साठी लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे. तसेच सुस व म्हाळुंगे गावातील सांडपाण्यासाठी देखील त्याचे व्यवस्थितरीत्या नियोजन करण्यासाठी कन्सल्टंट नेमण्यात आला आहे. दोन महिन्याच्या आत टेंडर काढून सांडपाणी लाईनचे काम चालू करण्यात येईल तसेच सुस व म्हाळुंगे गावासाठी बजेटमध्ये पिण्याचे पाणी, ड्रेनेज, विद्युत, कचरा तसेच इतर मूलभूत गरजांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. ही सर्व कामे याच वर्षी पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही आयुक्त यांनी या वेळी सुस व म्हाळुंगे ग्रामस्थांना दिली.
यावेळी सुस व म्हाळुंगे ग्रामस्थांनी सुस गावाला भरीव तरतूद उपलब्ध करून दिल्या बद्दल आयुक्त विक्रम कुमार यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले यावेळी सुस येथील अनेक विविध समस्या संदर्भात अनेक सोसायटीच्या वतीने नीरज थोरात, नितीन उपाध्य व निखिल मंचलवार यांनी आयुक्तांना निवेदन दिले.
यावेळी मल:निसारण विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष तांदळे, औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, रामदास ससार, सुहास भोते, माजी सरपंच नामदेव चांदेरे, नितीन कीसन चांदेरे, गोवर्धन बांदल, पुनम विधाते, समीर चांदेरे, नाना ससार, गणेश सुतार, नंदकुमार फणसे, सुरेश ससार, साहेबराव चांदेरे, चंद्रकात काळभोर, बाळासाहेब निकाळजे, तुळशीराम चांदेरे, जगन धनकुडे, सुखदेव चांदेरे व इतर ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे यांनी तर आभार प्रदर्शन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी मानत आयुक्त विक्रम कुमार हे नागरीकांच्या समस्या सोडवतील असा विश्वास व्यक्त केला.