सुस, म्हाळुंगे गावातील प्रश्न संदर्भात डॉ. सागर बालवडकर यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट.

0
slider_4552

पुणे :

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर यांनी पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या म्हाळुंगे आणि सुस या गावातील विविध प्रश्न संधर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सुस आणि म्हाळुंगे गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत निवेदन सादर केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली त्याबद्दल माहिती देताना डॉ. सागर बालवडकर यांनी मॅकन्यूजला सांगितले की, नागरीकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये विशेषतः जुन्या घरांना नियमित करणे, बांधकामाना नियमित करणे आणि व्यवसाय – उद्योगांचे परवाने दाखले महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे या प्रश्नांचा समावेश होता. त्याची  तात्काळ दखल घेत महानगरपालिका प्रशासनाला वरील विषयात लक्ष घालून लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना दिले.

डॉ. सागर बालवडकर यांनी परिसरातील अनेक नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या विषयाची दखल घेतल्याबद्दल अजित पवार यांचे आभार मानले. लवकरच सदर प्रश्न मार्गी लागतील अशी आशा व्यक्त केली.

 

 

See also  बाणेर बीटवाईज सर्व्हिस रोड भूमिपूजन व सत्कार समारंभ संपन्न.