राज्यात सरसकट शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु

0
slider_4552

मुंबई:

राज्यात सरसकट शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी सकारात्मक असल्याचं समोर आलं आहे. शिक्षण मंत्र्यांनी आज सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या (CEO) बैठक घेतली.

यामध्ये शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ग्रीन सिग्नल दिला आहे. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्सच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आता सरसकट शाळा सुरु करण्याचा विचार करत असल्याचं कळतंय.

पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याच्या हालचाली

कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर शाळा बंद होत्या. राज्य सरकारन टप्प्याटप्यानं शाळा सुरु केल्या आहेत. कोरोनाचं संकट दूर होताना दिसत आहे त्यामुळे पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात प्रयत्न केलं जात आहे. राज्य मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्सची चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे.

वर्षा गायकवाड यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा

वर्षा गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा केली. ह्या आव्हानात्मक काळात आपल्या शाळा मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या (CEO) बैठकीत सुरु झालेल्या शाळांचा जिल्हानिहाय आढावा,त्याअनुषंगाने तयारी,लसीकरण व नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेतला.

राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाच्या प्रगतीचा आढावा

राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, यासाठी शासनाने ‘आदर्श शाळा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले. शाळांच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला.पहिल्या टप्प्यात मराठवाडा विभागातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती व पुनर्बांधणी केली. हा सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम असून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1451516590382481414?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1451516590382481414%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  ईडी आणि इन्कम टॅक्सच्या बापाला घाबरत नाही : आमदार शशिकांत शिंदे