सोमेश्वरवाडी :
सोमेश्वरवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नूतन देवता मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा आणि मंदिर कलशारोहन व लोकार्पण सोहळा ज्ञानभास्कर श्री सद्गुरु महादेव शिवाचार्य महाराज यांच्या शुभहस्ते बुधवार दिनांक ४ मे रोजी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. कार्यक्रमाचे निमित्त १ मे ते ५ मे सांप्रदायिक क्षेत्रातील कीर्तनकारांचे कीर्तन झाले. काकड आरती, हरिपाठ, कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात सोमवार दिनांक 2 मे रोजी स्थापित देवतांची मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांच्या भव्य दिंडीने संपन्न झाली. या कार्यक्रमाची सांगता गुरुवार दिनांक 5 मे रोजी ह. भ. प. डॉ. पानेगावकर महाराज पुणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अवघा सोमेश्वरवाडी गाव भक्तिमय झाला. यावेळी गावातील महिला ग्रामस्थ विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला.