आशिया कप तिरंदाजी स्पर्धेत भारताचा दबदबा

0
slider_4552

सुलेमनिया (इराक) :

सुलेमनिया (इराक) येथे सुरु असलेल्या आशिया कप (स्टेज २) तिरंदाजी स्पर्धेत बुधवारी भारतीय तिरंदाजांनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत तीन सुवर्ण, दाेन राैप्य  तसेच एक कास्यपदक पटकाविले आहे.

या स्पर्धेत आज भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणा-या साता-याच्या (satara) पार्थ साळूंखेने उत्तम कामगिरी केली.

रिकर्व्ह प्रकारात तिहेरीत मृणाल चौहान पार्थ साळुंखे  आणि जुएल सरकार यांनी बांगलादेशचा (५-१) असा दणदणीत पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले.

रिकर्व्ह प्रकारात तिहेरीत महिला गटात अवनी, भजन कौर  आणि लक्ष्मी हेमब्रोम यांनी बांगलादेशचा (५-४) असा पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले.

मिश्र दुहेरी रिकर्व्ह प्रकारात पार्थ साळुंखे आणि भजन कौर यांना उझबेकिस्तानकडून (५-४) असा पराभव स्विकारावा लागला. यामुळे या दाेन्ही भारतीय खेळाडूंना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

दरम्यान भारतीय संघात समावेश असलेल्या साता-याच्या पार्थ साळुंखेने उझबेकिस्तानच्या अमीरखान सादिकोव्हचा (६-४) असा पराभव करून कास्यपदक जिंकले.

दरम्यान भजन कौरचा ईराणच्या महता अब्दोल्लाने २-६ असा पराभव केल्याने तिला रौप्य पदकावर समाधाना मानावे लागले. मृणाल चौहानने रुमन शानाचा (६-२) असा पराभव करीत सुवर्ण कामगिरी केली.

https://twitter.com/india_archery/status/1524328738778804224?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1524328738778804224%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  खेळाडूंसाठी खेळाची मैदाने सुरू करण्याबाबत सूचना द्याव्यात : अजित पवार