बावधन :
बावधन येथे मा. उपसरपंच दिपक दगडे यांच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापनदिनानिमित्त अनावश्यक खर्च टाळून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावधन बुद्रुक यांना शालेय साहित्य वाटप करण्यासाठी आर्थिक मदत केली. ही मदत संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा च्या कुंभार सर यांच्या कडे दिली.
या कार्यक्रमाची माहिती देताना माजी उपसरपंच दीपक दगडे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून राजकारणापेक्षा समाजकारण करण्यामध्ये पक्षाने नेहमीच भर दिला. आमचे नेते पवार साहेबांच्या आदर्श तत्वानुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन अनावश्यक खर्च टाळून बावधन येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय साहित्य खरेदी करणे करता आर्थिक मदत केली आहे.
त्यावेळी उपस्थित मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी अध्यक्ष महादेव आण्णा कोंढरे, खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मा. अध्यक्षा सविता दगडे, सूर्यदत्ता कॉलेज चे प्रमुख संजय चोरडिया सर, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका सायली वांजळे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, कुणाल वेडेपाटील, माजी सरपंच निलेश दगडे, युवा नेते अभिजीत दगडे, मयुरी तोडकर, रेश्मा केदारी, मनीषा भोसले आणि ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते.