सुतारवाडी :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिना निमित्त योगेश सुतार युवा मंच व विश्व सेवा आय केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १४ मधील सुतारवाडी, पाषाण, बावधन, सोमेश्वरवाडी परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद होता ४२१ नारिकांनी नेत्र तपासणी करुन ३६५ नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महापौर व पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, योगेश सुतार यांनी सामाजिक बांधिलकी जपत पक्षाचा वर्धापनदिन नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप करून चांगल्या प्रकारे साजरा केला. राजकारणात काम करताना सामाजिक सेवेचे भान त्याने जपलंय परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन त्यांनी नेत्रतपासणी सारखे चांगले शिबिर आयोजित केले.
कार्यक्रमास माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, स्वीकृत नगरसेवक बालम सुतार, पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, गिरीश गुरनानी, संदीप बालवडकर, सागर बालवडकर, दीपक दगडे, कुणाल वेडे, नीलेश दगडे, श्रीकांत बालघरे, अजिंक्य पालघर, शैलेंद्र कदम, निखिल बालवडकर, सविता ताई दगडे, सानिया झुंजारराव, संध्या सोनवणे, सुषमा सातपुते, रोहिणी सुतार, उज्वला जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन योगेश रोहिदास सुतार (सरचिटणीस- राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर, कोमल योगेश सुतार (अध्यक्ष- समता महिला बचत गट)व योगेश सुतार युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले होते.