सुतारवाडी :
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुतारवाडी येथे स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांच्या वतीने आणि प्रिस्टन आयुर इंडीया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १४ सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बावधन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची सेवा देण्याच्या हेतूने २५० नागरिकांची अत्याधुनिक जर्मन टेक्नॉलॉजी च्या साह्याने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य बद्दल सुयोग्य सल्ला तज्ञ डॉक्टर मार्फत देण्यात आला.
यावेळी बोलताना भाजपा कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी म्हणाले की, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सेवाभावी कार्यक्रमातून साजरा व्हावा अशी आम्हा कार्यकर्त्यांची इच्छा होती. आमच्या धोरणानुसारच शिवम सुतार यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आयोजित केलेले मोफत आरोग्य शिबीर अतिशय कौतुकास्पद आहे. भारतीय जनता पार्टीचचे कार्यकर्ते नेहमीच नागरिकांची सेवा करण्यासाठी अग्रेसर असतात. येणाऱ्या पुढील काळात देखील शिवम सुतार यांनी असेच सेवाभावी कार्यक्रम समाजासाठी घेत राहावे.
यावेळी माजी नगरसेवक किरण दगडे, माजी आयएएस अधिकारी दादासाहेब जागडे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, राहुल कोकाटे, गोरख दगडे, लहू बालवडकर, सचिन दळवी, रोहन कोकाटे, उद्योजक अंबादास कोकाटे, सुरेश कोकाटे, हभप बाळासाहेब सुतार, हभप दत्तात्रय दहिभाते, विश्वास सुतार, विट्ठल सुतार, दयानेश्वर भेगडे, दिलीप सुतार आणि मित्र परिवार आदि उपस्थित होते.