नितिन रणवरे यांच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा संपन्न..

0
slider_4552

औंध :

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून युवा नेते नितीन रणवरे आणि प्राजक्ता नितीन रणवरे यांच्यावतीने परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एकाच वेळी दोन रुग्णवाहिका सेवा लोकार्पण सोहळा आणि परिसरामध्ये प्रथमच पाच हजार कुटुंबांना प्रथमोपचार पेटी चे वाटप आज इंदिरा वसाहत औंध येथे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.

या वेळी बोलताना माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, नितीन रणवरे हा सामाजिक भान जपणारा कार्यकर्ता आहे. त्याने नागरिकांचे हित लक्षात घेऊन सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका लोकार्पण आणि काम पाच हजार कुटुंबांना प्रथमोपचार पेटी वाटप करण्याचे आदर्श काम करत आहे. या भागामध्ये एक कष्टकरी समाज राहत असून त्यांची सेवा केली तर नागरिक पाठीशी उभे राहतात. नागरिकांची सेवा करण्याचं काम नितीन करत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक निश्चितच त्याच्या पाठीशी उभे राहतील. पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी नितीन रणवरे ला ताकत देण्याचे काम करेल. जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी कोथरुड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका अर्चना मुसळे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेवक सनी निम्हण, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, बाळासाहेब रानवडे, सचिन दळवी, सिद्धार्थ रणवरे, गणेश कलापुरे, अभिजीत गायकवाड, सचिन वाडेकर, प्रतुल बागडे, उमा गाडगीळ, मीना पारगावकर, प्रमोद कांबळे, सुभद्रा कुंभार, मुन्ना वाल्मिकी, निलेश जुनवणे, राहुल गायकवाड, महेंद्र जुनवणे, सुनील अवघडे, संदीप वाल्मिकी, अजय नागतिलक, आणि महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  औंध येथे निर्माल्यकलश पुजन उत्साहात संपन्न