अतिमुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

0
slider_4552

पुणे:

पुणे मध्ये धुवाधार पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसामुळे पुणे शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आलेली आहे.
त्यानुषंगाने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व मनपा
खाजगी शाळांना अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित इ. शाळांना दिनांक
१४/०७/२०२२ रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

तथापि पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर
कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषगांने शाळेत उपस्थित राहतील.

मागील तीन दिवस पुणे शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शहर आणि ग्रामीण परिसरात अति मुसळधार पाऊस पडत आहे. तीन दिवस पुण्यात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

See also  पुण्यात पर्यायी इंधनाच्या क्षेत्रात चांगले काम : आदित्य ठाकरे