बाणेर :
भारतीय जनता पक्षाचे सचिन मानवतकर यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त औंध तसेच बालेवाडी परिसरातील महिलांना साडी वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार हर घर तिरंगा या मोहिमेनिमित्त यावेळी महिलांना साडी बरोबर तिरंगा देखील भेट देण्यात आला.
शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, शहर भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, शिवाजीनगर भाजपा अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, युवानेते लहू बालवडकर, उमा गाडगीळ यांच्या हस्ते सर्व महिलांना साडी व तिरंगा वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की सचिन मानवतकर यांनी अत्यंत कमी वेळात चांगल्या प्रकारे सामाजिक कामांमध्ये आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या या सामाजिक कामांची नक्कीच दखल घेतली जाईल. तर माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले की एक गरीब कुटुंबातील सर्वसामान्य मुलगा निष्ठेने समाजकार्य करतो त्याला नक्कीच परिसरातील नागरिकांनी आशीर्वाद द्यावा.
यावेळी गणेश बगाडे, संजय निम्हण, सूरज गायकवाड, रमेश ठोसर तसेच औंध बालेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.