सुतारवाडी :
साहित्य रत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्त फकिरा फाउंडेशन व शिवसेना शाखा सुतारवाडी व महेश भिमराव सुतार मित्र परिवार तसेच स्वराज्य प्रतिष्ठान च्या वतीने आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पूजन करून मानवंदना देण्यात आली
साहित्य रत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना मानवंदना देताना शिवसेना युवा नेते महेश सुतार यांनी सांगितले की, सर्वसामान्य माणसाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. हे मानवा तू गुलाम नाहीस तू या वास्तव जगाचा निर्माता आहे. असे ते म्हणत. साहित्य व पोवाड्यातून त्यांनी नागरिकांची जनजागृती केली. वंचित लोकांसाठी त्यांनी अविरत पणे त्यांनी काम केले. त्यांची एक एक वाक्य रचना प्रेरणा निर्माण करायची. मराठी भाषेची पताका साता समुद्रा पलीकडे नेण्याचे महत्त्वपूर्ण कामही त्यांनी केले. अशा या साहित्य रत्नास आदर पूर्वक मानवंदना देत आहे.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पाषाण सुतारवाडी, शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.