सचिन दळवी यांनी काढली सोमेश्वर वाडी परिसरात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत तिरंगा जनजागृती रॅली..

0
slider_4552

सोमेश्वरवाडी :

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव देशभर साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाअंतर्गत 13 ते 15 ऑगष्ट दरम्यान सर्वत्र ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. म्हणूनच भाजपा युवा नेते सचिन दळवी यांच्या वतीने सोमेश्वरवाडी येथील कै. पद्मभूषण वसंत दादा पाटील प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक ५४ जी, ११ जी, सोमेश्वर वाडी येथील विद्यार्थ्यांसोबत सोमेश्वर वाडी परिसरामध्ये हर घर तिरंगा जन जागृती रॅली काढून हर घर तिरंगा मोहिमेकरिता जनजागृती केली.

याबद्दल माहिती देताना भाजपा युवा नेते सचिन दळवी म्हणाले की, अवघ्या भारत देशाच्या अभिमानाचा क्षण म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, तो अतिशय उत्साहात देशभरात साजरा होणार आहे. म्हणूनच “हर घर तिरंगा” अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. हे अभियान आपल्या परिसरात मोठ्या उत्साहात राबविण्यात यावे याकरिता आपला अभिमान आपला तिरंगा ध्वज सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन “हर घर तिरंगा” या अभियानात सामील होण्याकरिता आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा सुवर्णक्षण ऐतिहासिक करण्यासाठी मोठ्या उत्साहात साजरा करावा म्हणून जनजागृती करण्यात आली.

यावेळी प्रभाग क्रमांक १४ चे युवा नेते शिवम सुतार, सचिन दळवी मित्र परिवार आणि प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी वर्ग विद्यार्थ्यांसहित उपस्थित होते.

 

See also  बाणेर नागरी पतसंस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्यांचा सन्मान.