उपसरपंच दीपक दगडे पाटील यांच्या वतीने बावधन परिसरात तिरंगा वाटप.

0
slider_4552

बावधन :

“हर घर तिरंगा’ आणि “स्वराज्य महोत्सवा’ला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ह्या महोत्सवात प्रत्यकाने सहभाग घ्यावा म्हणून बावधन परिसरातील नागरिकांसाठी उपसरपंच दीपक दगडे पाटील यांच्या वतीने तिरंगा वाटप करण्यात आले.

याची माहिती देताना उपसरपंच दीपक दगडे पाटील म्हणाले की, देशाच्या इतिहासात प्रथमच असे प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे अभियान होत आहे. राज्यातील सर्व घरांवर दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा फडकावून सर्वांनी यामध्ये उत्साहाने सहभागी व्हावे. भारत यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्याच्या निमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने हे अभियान राबवले जात आहे. याचा उद्देश लोकांच्या मनात देशभक्ती जागृक करणे आणि राष्ट्रध्वजाबाबत जागृकता वाढवणे आहे.

म्हणुनच मी बावधन परिसरातील नागरिकांना आव्हान करत आहे की, ‘हर घर तिरंगा’ या अभियानात सहभागी होवून इतिहासाचे साक्षीदार व्हावे असे उपसरपंच दीपक दगडे पाटील यांनी सांगितले.

See also  बालेवाडी रेसिडेन्सी को-ऑपेराटीव्ह हौसिंग वेल्फर फेडेरेशनच्या वतीने कोवीड लसीकरण मोहीम सुरू...