पुणे बार असोसिएशन तर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा…

0
slider_4552

पुणे :

पुणे जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशन तर्फे जिल्हा न्यायलय येथे सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.३० वा. पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. संजयजी देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. तसेच याप्रसंगी सूरसरगम सुराली ऑर्केस्ट्रा या दृष्टीहीन समूहाचा कलाविष्कार कार्यक्रम व भारतीय क्रांतिकारकांचे दुर्मिळ छायचित्रांचे प्रदर्शन अशोका हॉल येथे भरविण्यात आले होते.

याप्रसंगी माननीय जिल्हा न्यायाधीश संजयजी देशमुख साहेब यांनी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग थोरवे म्हणाले की, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपले आयुष्य देशासाठी अर्पण केले अश्या सर्वांचे बलिदान आपण सदैव स्मरणात ठेवले पाहिजे व या स्वातंत्र्याची मूल्य आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे व देशाप्रती आपण देणे लागतो या भावनेने कार्य केले पाहिजे. व सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

सदर सोहळ्यास पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष- ऍड. विवेक भरगुडे, उपाध्यक्ष- ॲड. लक्ष्मण येळे पाटील सेक्रेटरी- ॲड. अमोल शितोळे, सचिव ॲड. सुरेखा भोसले, खजिनदार ॲड. प्रथमेश भोईटे, हिशोबा तपासणीस ॲड. शिल्पा कदम व कार्यकारिणी सदस्य – ॲड. काजल कवडे, ॲड. सई देशमुख, ॲड. अर्चिता जोशी, ॲड. अमोल भोरडे, ॲड. मजहर मुजावर, ॲड. अजय नवले, ॲड. अमोल दुरकर, ॲड.तेजस दंडागव्हाळ, ॲड. कुणाल अहिर, ॲड. रितेश पाटील व मोठ्या संख्येने न्यायाधीश व वकील बांधव व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

See also  मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजनेतील बाणेर -बालेवाडी-औंध भागातील कामाची निविदा लवकरच