झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने सात समुद्रापार भारतीय ध्वज फडकावत दिली मानवंदना.

0
slider_4552

झिम्बाब्वे :

सोमवारी (१५ ऑगस्ट २०२२) संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करतोय. सर्व भारतीय आपापल्या पद्धतीने या स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. भारतातील अनेक दिग्गजांनी पंतप्रधानांनी आवाहन केलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागही नोंदवला.

अशातचं काही भारताबाहेरील क्रिकेटपटूंनीदेखील भारतीय नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. त्याचवेळी झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने देखील सात समुद्रापार भारतीय ध्वज फडकावत आपली मानवंदना सादर केली.

भारतीय संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. सध्याच्या संघात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रिषभ पंतसारखी मोठी नावे नसली तरी केएल राहुल, शिखर धवन सारखे अनुभवी खेळाडू या संघाचा भाग आहेत. भारतीय संघ १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेशी दोन हात करेल. असे असताना त्याआधी संपूर्ण भारतीय संघाने स्वातंत्र्यदिन साजरा केला. हरारे येथील भारतीय संघाने त्यांच्या हॉटेलबाहेर तिरंगा फडकावत तसेच, राष्ट्रगीत गात या सोहळ्यात सहभाग नोंदवला.

झिम्बाब्वेमध्ये असलेल्या भारतीय खेळाडूंनी जसा स्वातंत्र्य दिन साजरा केला तशाच प्रकारे भारतात असलेल्या आजी-माजी खेळाडूंनी देखील या उपक्रमात सहभाग नोंदवला. माजी भारतीय कर्णधार विराट कोहली, विद्यमान कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधर हार्दिक पांड्या यांच्यासह भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी देखील आपल्या घरी ध्वज फडकवला.

आयपीएलमुळे भारताशी घट्ट नाते झालेला ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, वेस्ट इंडीजचा विश्वविजयी कर्णधार डॅरेन सॅमी व दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस यांनी देखील आपल्या सोशल मीडिया खात्यांवरून भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

https://twitter.com/BCCI/status/1559155493150629891?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1559155493150629891%7Ctwgr%5E4adcc09310bcd9a3d48220ff6178a8fd7ce29664%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय कुस्ती पैलवानानी जिंकली तीन सुवर्ण पदके...