पुणे :
गणेश उत्सव काळात पुण्यात 31 ऑगस्टपासून 9 सप्टेंबरपर्यंत दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत.







गणेश उत्सव काळात दारू विक्री करता येणार नाही. गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी मोठ्या प्रमाणावर दारु विक्री होत असते. त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता असते.
त्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात दारु विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. यामुळे आता हा सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यामुळे देखावे आणि इतर कार्यक्रम देखील सर्वांना व्यवस्थित बघता येणार आहेत.
पुण्यात दिलेल्या तारखांनुसार मद्यविक्रीची दुकानं, बिअर बार पूर्णपणे बंद ठेवण्यात येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली असून ते शहरात तपासणी करतील अशी माहिती समोर आली आहे.








