सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व महा आरोग्य शिबिराचे आयोजन.

0
slider_4552

सोमेश्वरवाडी :

भाजपा युवा नेते सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १४ ,सोमेश्वरवाडी, पाषाण, सुतारवाडी, बावधन या परिसरातील नागरिकांसाठी महा आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबीर तसेच मोफत चष्मे वाटप शनिवार दि. १०/०९/२०२२ रोजी सकाळी १० : ०० ते ५ : ०० या वेळेत सचिन दळवी जनसंपर्क कार्यालय सोमेश्वरवाडी येथे होणार आहे.

याबद्दल माहिती देताना युवा नेते सचिन दळवी यांनी सांगितले की, माझा वाढदिवस साजरा करताना तो सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा अशी इच्छा होती. म्हणून प्रभागातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारे महाआरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले आहे. परिसरातील नागरिकांना आव्हान आहे की, या शिबिरामध्ये अत्यंत महत्वाच्या आरोग्य तपासण्या होणार आहे तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा हि विनंती.

या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप होणार आहे. तसेच हृदयरोग, मणके विकार शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया उपचार व तपासणी, मेंदू विकार शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे.

शिबिरासाठी संपर्क :
मनोज मोरे : 7028381352
अनिकेत चव्हाण : 9511296390

See also  द बिंग यू संस्था व लहू बालवडकर सोशल वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार..!