सचिन दळवी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा.

0
slider_4552

सोमेश्वरवाडी :

सद्या सगळीकडे सुरू असलेल्या वायरल इन्फेक्शन मुळे नागरिक परेशान आहे. याचाच विचार करून आपला वाढदिवस युवा नेते सचिन दळवी यांनी सोमेश्वरवाडी, पाषाण, सुतारवाडी, बावधन परिसरातील नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर आयोजित करून साजरा केला. या आरोग्य शिबिराची सुरूवात सोमेश्वरवाडी ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आली. नागरिकांनी उत्फुर्त प्रतिसाद देत जवळपास ८०० जणांनी आरोग्य तपासणी करून घेतली तर ४५० नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. आवश्यक असणाऱ्या ७० शिबिरार्थींना शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे.

या वेळी युवा नेते सचिन दळवी यांनी समाधान व्यक्त करताना म्हंटले की, येवढ्या मोठया प्रमाणात नागरिकांनी शिबिराचा लाभ घेउन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भविष्यात देखील विविध उपक्रमातून नागरिकांची सेवा करत राहील. सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिले त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

सचिन दळवी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित राहून सचिन दळवी करत असलेल्या कार्याचे कौतुक करत भावी आयुष्यात असेच सामाजिक कार्य करत राहावे याकरिता शुभेच्छा दिल्या.

भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर आणि कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी यांनी सचिन दळवी यांच्या कामाचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रलाद सायकर, लहू बालवडकर, शिवम सुतार, मोरेश्वर बालवडकर, पोपटरावं जाधव, खंडू आरगडे, रोहिदास घोलप, ज्ञानोबा आरगडे, धनंजय बामगुडे, मनोहर आरगडे, सुनील खुळे, योगेश विधाते, शंकर आरगडे, दीपक जाधव, संतोष आरगडे आणि सोमेश्वरवाडी ग्रामस्थ व सचिन दळवी मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.

See also  स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक अमोल बालवडकर : राजेश पांडे