शिवाजीनगर :
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ शुक्रवार दि. १६ सप्टेंबर २०२२ रोजी दिपक केसरकर, शालेय शिक्षण मंञी , महाराष्ट्र राज्य व आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी ‘ज्ञानमय’ या संशोधनपर जर्नलचे प्रकाशन झाले. हा आरोग्यविशेषांक आहे. पी ई सोसायटीने गौरवास्पद कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे.
शिक्षक संवादाने सुरु झालेल्या संभाषणाचा समारोप करताना मंत्री दिपक केसरकर म्हणाले,” शिक्षणाचे धोरण ठरविताना मुलांच्या वाढीचा दर कमी होणार नाही व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा या शैक्षणिक धोरणाचा हेतू आहे. पुस्तकांबरोबरच वही देणे हे ही आमचेच काम आहे.”
आमदार सिध्दार्थ शिरोळे, म्हणाले की, “आज शिक्षण खुप महाग झाले आहे. अल्पदराने सातत्याने विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी पी ई सोसायटी हि एक नामवंत संस्था आहे.”
प्रा. डाॅ गजानन र. एकबोटे, कार्याध्यक्ष, पी ई सोसायटी म्हणाले,”राष्ट्रीय शालेय शिक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण संस्थाना थोडी लवचिकता द्यावी. नियम बनविण्यासाठी एखादी राजस्तरीय किंवा केंद्र स्तरीय संस्था असावी.”
या प्रसंगी पुढील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला
गुणवंत विद्यार्थी – पुरस्कार्थी
डाॅ दिग्विजय गजानन एकबोटे – ह्रुमाॅटाॅलाजी परीक्षा डिस्टिंशनने उत्तीर्ण
सिध्देश अडसुळ – NNMS निवड यादीमध्ये विद्यार्थी निवड
दिक्षा बोडके – १०वी मधे ९९.६०% मिळवून उत्तीर्ण
पृथा वटीकर- आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू
श्रुती महाबळेश्वरकर – राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सर्वोकृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक
गायञी चपटे – मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधे ग्रामीण जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक
अंकित गुप्ता – भारतीय दंड संहितेवर कविता लिहिण्याचे जागतिक रेकाॅर्ड
प्रसाद सावंत – ई ८वीच्या शिष्यवृत्ती मधे २५ वा व पुणे जिल्ह्यात ११ व पिंपरी चिंचवड मधे २ रा क्रमांक
माॅडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे ५ – (सुजित, ओंकार, माहेश्वरी, तेजस, नंदिता व शिवम) या टीमला AICTE स्मार्ट ईंडिया हॅकेथाॅन या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते
शौनक प्रसादे – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सर्वोकृष्ट खेळाडू पुरस्कार
श्रुती उबाळे – भ्रमध्वनी या चिञपटातील मुख्य भूमिकेसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार व पुणे फिल्म फेस्टिवल मधे सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक मा प्रा डाॅ ज्योत्स्ना एकबोटे, सहकार्यवाह, , पी ई सोसायटी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा डाॅ राजेंद्र झुंझारराव, प्राचार्य, माॅडर्न महाविद्यालय, पुणे ५ यांनी केला. आभार प्रदर्शन प्रा शामकांत देशमुख, कार्यवाह, पी ई सोसायटी यांनी केले. ईशस्तवन व पसायदान प्रा प्रियांका यांनी केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा डाॅ रेणू भालेराव व सौ सुषमा नानगुडे यांनी केले. यादीवाचन डाॅ मृगजा कुलकर्णी यांनी केले.
या प्रसंगी शिक्षण खात्यातील व विद्यापीठातील मान्यवर उपस्थित होते तसेच पी ई सोसायटीचे अध्यक्ष विग्घहरी महाराज देव, प्रा. शामकांत देशमुख( कार्यवाह, प्रो. ए. सोसायटी ) ,प्रा. डॉ. सौ. ज्योत्सा एकबोटे( सहकार्यवाह, प्रो. ए. सोसायटी) , प्रा. सुरेश तोडकर (सहकार्यवाह, प्रो. ए. सोसायटी) , डाॅ निवेदिता एकबोटे, उपकार्यवाह, नियामक व अजीव मंडळाचे सदस्यही उपस्थित होते .पी ई सोसायटीच्या सर्व संस्थामधील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.