पुणे बार असोसिएशन तर्फे पोलिस आयुक्त यांना निवेदन.

0
slider_4552

पुणे :

पुणे बार असोसिएशन तर्फे मंगळवार दिनांक २०/०९/२०२२ रोजी पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना वकीलांवर दाखल होत असलेल्या गुन्ह्यासंदर्भात निवेदन दिले.

अलीकडच्या काळात वकीलांवर मोठ्या प्रमावावरती गुन्हे दाखल होत आहेत. बऱ्याचदा खोटया तक्रारीवरून गुन्हे दाखल होतात आणि नंतर विनाकारण वकीलांना त्रास व बदनामी सहन करावी लागते. तसेच दृष्ट हेतूने  वकीलांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात सखोल चौकशी व्हावी तसेच वकीलांवर गुन्हे दाखल करत असताना सदरच्या गुन्ह्यात वकिलांचा खरच सहभाग आहे की नाही याची सर्व प्रकारची शहानिशा करावी. असे म्हणणे पुणे बार असोसिएशन तर्फे मांडण्यात आले.

याप्रसंगी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे, उपाध्यक्ष. ॲड. विवेक भरगुडे, माजी अध्यक्ष ॲड. श्रीकांत अगस्ते, ॲड.सतिश मुळीक, ॲड. विकास ढगे-पाटील, ॲड. राजेंद्र दौडकार, ॲड. पंडित कापरे, ॲड. प्रमोद पाटील, ॲड. लक्ष्मण राणे, ॲड. कुमार पायगुडे, ॲड. सचिन गेलडा, तसेच जेष्ठ विधीज्ञ व मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते.

See also  आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन मानवतकर यांच्या वतीने औंध - बालेवाडी मधील सफाई कामगारांना भेटवस्तू व मिठाई वाटप.