शिवाजीनगर :
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातील विविध उपक्रमांचे डिजिटल पद्धतीने उद्धाटन सोमवार दि २६ सप्टेंबर २०२२ रोजी आमदार चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार सिध्दार्थ शिरोळे हे उपस्थित होते. या प्रसंगी माॅडर्न महाविद्यालय शिवाजीनगर व माॅडर्न ईंजिनिअरींग महाविद्यालय यांच्या उपक्रमांचे डिजिटल उद्धाटन करण्यात आले.
उपक्रम पुढीलप्रमाणे
आय माॅडर्ना व्हर्च्युअल ईनफाॅर्मर : शिवाजीनगर माॅडर्न मधील संख्याशास्ञ व संगणकशास्ञ विभाग या विभागातर्फे विकसीत : व्हच्युअल लायब्ररी
याशिवाय माॅडर्न ईंजिनिअरींग महाविद्यालयातील
आंतरप्रिनिअरशीप डेव्हलपमेंट सेल : व्यवसाय उत्तेजनाला प्रोत्साहन ( ६४ काॅपीराईटस, ३२ पेटंट)
कास्तकार : शेतीशी संबंधित असलेले डिजिटल अॅप
सेरी : विद्यार्थी व पालकांच्या अँडमिशनशी संबंधित सगळ्या प्रश्नांची घरबसल्या उत्तरे मिळतात
न्युट्रिडिश : रेडी टू ईट फळे व ड्रायफ्रुटस : जे डाँक्टरांच्या सल्याने बदलता येते.
माॅडर्न विधी महाविद्यालय
ईनोव्हेशिया : ईटलेच्युअल प्राॅपर्टी राईटस
या उपक्रमांचे डिजिटल उद्धाटन झाले.
याशिवाय माॅडर्न विधी महाविद्यालयातील
७५ लँडमार्क जजमेंटस : या जर्नलचे उद्धाटन केले. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त सुप्रीम कोर्टाने दिलेले दरवर्षी एक याप्रमाणे महत्वाच्या निर्णयचे हे पब्लिकेशन आहे. याचा उपयोग विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
या प्रसंगी काही गुणवंताचा सत्कार करण्यात आला.
१) डॉ. श्री. एम्. एस्. जाधव लेखापरिक्षक, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे ५ “आसाम डाउन टाउन युनिव्हर्सिटी’ या विद्यापीठाची मानाची “D.Litt (Honoris Causa)” ही पदवी आसाम राज्याचे राज्यपाल मा. श्री. जगदिश मुखी यांच्या हस्ते प्रदान
२) कु. प्रतिक्षा शेलार
पुरुषोत्तम स्पर्धेत उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून प्रथम क्रमांक
३) कु. आकाश पवार
पुरुषोत्तम स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयात उत्तेजनार्थ पुरस्कार
४) कु. अनुजा जोशी
पुरुषोत्तम स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयात उत्तेजनार्थ पुरस्कार
५) कु. तनया जाधव
‘भाग धन्नो भाग’ या पुरुषोत्तम स्पर्धेतील एकांकिकेत शुभा या भुमिकेसाठी अभिनय नैपुण्य (अभिनेत्री) म्हणून पुरस्कार
६) कु. सिमरन नार्वेकर
सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या एम
एसस्सी. जैवतंत्रज्ञान विद्याशाखा अंतिम परीक्षात प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त
७) कु. सिद्धेश नेवे
अहो ऐकलत का? या पुरुषोत्तम स्पर्धेतील एकांकिकेतील आबा या भुमिकेसाठी अभिनय उत्तेजनार्थ पुरस्कार
८) कु. मयुरी भोसले
सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या बी. फार्मसी विद्याशाखा अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांक तसेच जीपॅट परीक्षेमध्ये ओल ईंडिया रॅंकर
९) कु. अथर्व मोडक
३०वी वरिष्ठ राष्ट्रीय वुशु (चायनीज मार्शल आर्ट्स) चॅम्पियनशिप विजेता
११ देशात भारताचे प्रतिनिधित्व
१०) चि. आर्य फडतरे
फिरोदिया करंडक स्पर्धेत लोक गायनात प्रथम पुरस्कार
११)चि. जय नासेरी
फिरोदिया करंडक स्पर्धेत सुगम गायन पुरुष मधे प्रथम पुरस्कार
१२) चि. पार्थ इनामदार
फिरोदिया करंडक स्पर्धेतील ढोलकी वादनात प्रथम पुरस्कार
१३) कु. श्रुती सातपुते
फिरोदिया करंडक स्पर्धेतील पोट्रेट पेंटिंग स्पर्धेत प्रथम पुरस्कार
गुणवत्तेचे शिक्षण कमी खर्चात मिळत नाही तोपर्यंत सामान्यांसाठी ते उपलब्ध होणार नाही. सामान्य जनतेला खाजगी संस्थांमधूनही कमी खर्चात उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, शिक्षण आणि आरोग्यावर विशेष लक्ष दिल्यास देशाच्या विकासाला चालना मिळू शकेल. त्यामुळे स्वस्त आणि उत्तम शिक्षण सुविधा सर्वांना उपलब्ध असणे आवश्यक आहे. यावर्षी काही महाविद्यालयांना भेट देऊन एफआरएने निश्चित केलेल्या शुल्काची तपासणी केली जाईल.
कार्यक्रमाची सुरवात प्रा. प्रियांका भट यांनी गायलेल्या ईशस्तवनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे कार्यवाह प्रा शामकांत देशमुख यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेच्या सहकार्यवाह डाॅ जोत्स्ना एकबोटे यांनी केले.
सुत्रसंचालन संस्थेच्या उपकार्यवाह डाॅ निवेदिता एकबोटे
यांनी केले. गुणवंताचे यादी वाचन डाॅ संजय खरात प्राचार्य माॅडर्न महाविद्यालय गणेशखिंड यांनी केले.
प्रसंगी शिक्षण खात्यातील व विद्यापीठातील डाॅ सुधाकर जाधववर, रामदास झोळ, एम एस जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच पी ई सोसायटीचे अध्यक्ष विग्घहरी महाराज देव, प्रा. सुरेश तोडकर (सहकार्यवाह, प्रो. ए. सोसायटी) , डाॅ निवेदिता एकबोटे, उपकार्यवाह, नियामक व अजीव मंडळाचे सदस्यही उपस्थित होते .पी ई सोसायटीच्या सर्व संस्थामधील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.