औंध :
नवरात्री उत्सवानिमित्त औंध, सोमेश्वरवाडी, बोपोडीच्या महिला, बालिका व युवतींसाठी माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने मोफत मेहंदी महोत्सवाचे आयोजन केले असुन या निमित्त १ व २ ऑक्टोंबर रोजी सायं. ५ ते ८ वाजपर्यंत मोफत मेहंदी अभियान राबविणार आहे.
याबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, नवरात्री उत्सव म्हणजे महिलांसाठी आनंदाचे नऊ दिवस असतात. नवरात्र म्हणजे महिलांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा उत्सव. म्हणूनच नवरात्री उत्सवानिमित्त आम्ही औंध, सोमेश्वरवाडी, बोपोडीच्या महिला, बालिका व युवतींसाठी मोफत मेहंदी महोत्सव आयोजित करत आहोत. तरी सर्व महिलांना विनंती आपण सहभागी होवून या महोत्सवाचा लाभ घ्यावा. आमचे मेहंदी कलाकार येऊन दिलेल्या ठिकाणी मोफत मेहंदी काढून देणार आहे. तरी सर्व महिला भगिनींनी बालिका आणि युवतींनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे.
महोत्सवाचा कालावधी व स्थळ :
पद्मावती मंदिर सोमेश्वरवाडी, पाषाण
छत्रपती शिवाजी महाराज चौक, औंध
बालवाडी गोल्डन चौक, इंदिरा वसाहत औंध
अण्णाभाऊ साठे समाज मंदिर, कस्तुरबा वसाहत औंध
समृद्धी गणेश मंदिर, चांदणी चौक, बोपोडी
वेळ : सायंकाळी ५ : ०० ते ८ : ००