सोमेश्वरवाडी :
महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माजी कार्यसम्राट आमदार स्व. विनायक निम्हण यांच्या घरी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली व कुटुंबीयांशी संवाद साधून सनी निम्हण यांचे ठाकरे कुटुंबियांकडून सांत्वन केले.
आदित्य ठाकरे यांनी आज शिवसेनेचे दिवंगत शहरप्रमुख माजी आमदार विनायक निम्हण यांच्या प्रतिमेला अभिवादन केले आणि त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. निम्हण हे पुण्यातील आक्रमक आणि धडाडीचे नेते होते. त्यांची उणीव नेहमीच शिवसेनेला जाणवत राहील असे ते म्हणाले.
यावेळी उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र डॉ. नीलमताई गोरे, आमदार सचिन आहेर, गजानन थरकुडे, संजय निम्हण उपस्थित होते.